दिनांक ८ मार्च २०१८ :- काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन
यांच्या वतीने तापकीर चौक, काळेवाडी, पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध
कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रणरागिणींचा सन्मान चिन्ह
देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मा श्री
वसंतजी हाके उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक सतीश माने साहेब, औषध निरीक्षक भाग्यश्री यादव, औषध निरीक्षक सचिनजी
कांबळे, सि.ए.पी.डी चे ऑर्गनाईजिग सेक्रेटरी अतुल शहा, इ.सी. मेम्बर अमोल शिनकर, श्री
नरेंद्र आगरवाल, थेरगाव केमिस्ट असोसिएशनचे
अध्यक्ष रवी पवार, होलसेल
व्यापारी प्रशांत राउत, प्रवीण मुथा, दिलीप शहा, कमलेश शिनकर,मारुती हाके, दीनदयाल
गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.