कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने “सन्मान महिला कर्तृत्वाचा”




दिनांक ८ मार्च २०१८ :- काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने तापकीर चौक, काळेवाडी, पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रणरागिणींचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मा श्री वसंतजी हाके उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने साहेब, औषध निरीक्षक भाग्यश्री यादव, औषध निरीक्षक सचिनजी कांबळे, सि.ए.पी.डी चे ऑर्गनाईजिग सेक्रेटरी अतुल शहा, इ.सी. मेम्बर अमोल शिनकर, श्री नरेंद्र आगरवाल, थेरगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार, होलसेल व्यापारी प्रशांत राउत, प्रवीण मुथा, दिलीप शहा, कमलेश शिनकर,मारुती हाके, दीनदयाल गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.


ख्यातनाम डॉक्टर माधुरी शिंगाडे, विमलसन्स सारीज् च्या संचालिका संध्या उमेश शिंदे, अनुभवी  महिला फार्मासिस्ट स्वाती आवटे व विविध क्षेत्रातील महिला भगिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला.


सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मा श्री वसंतजी हाके यांनी अध्यक्षीय भाषणात महिला क्रांतीचा इतिहास विशद करून महिलाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच औषधांची विक्री करताना मेडिकल विक्रेत्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.


वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी आपल्या भाषणात अयोजकाचे कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत कॊतुक केले. महिलांची सुरक्षितता जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असून महिलांना समान दर्जा देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी आपल्या भाषणात सर्वाधिक महिला या मेडिकल व आरोग्य क्षेत्रातील कार्यरत असून पुरुषपेक्षा त्या समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. महिलांना विविध क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी सर्वतोपरी मदत असोसिएशन तर्फे केली जाईल. तरी मेडिकल क्षेत्रातील महिलांनी आपल्या अडचणी समस्या असोसिएशन पुढे मांडाव्यात त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आवाहन केले.


पुरस्कार प्राप्त भगिनी शिल्पा सातपुते व शारदा पवार यांनी सन्मान केल्याबद्दल काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले. आज पर्यत आम्ही केलेल्या कष्टाचे आज चीज झाले असून आमच्या कार्याची दखल घेवून आमचा सत्कार केल्याने आम्हाला नवी उमेद प्राप्त झाली असून पुढील कार्य करण्यात नवी उर्जा प्राप्त झाली आहे.


कार्यक्रमाचे संयोजन काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री विवेक मल्हारीशेठ तापकीर, प्रशांत सपकाळ, किरणकुमार निकम, परविंदरसिंग बाध, प्रशांत कदम, म्हाळाप्पा दुधभाते, निलेश अमृतकर, अतुल तमनार, अण्णासाहेब शेंडकर, रामदास तांबे, निखील जगताप, अक्षय भड, तेजस साळवी, प्रदीप शिवगजे, संभाजी ठाणेकर, खिवराज चौधरी, संपत गुणावरे , सुयोग दोरगे, विनीत कलाटे, आशिष परमार सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्नील जंगम यांनी केले.

अधिक फ़ोटो पाहण्यासाठी क्लिक करा















































 

No comments :

Post a Comment