कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

तापकीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

       
  शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित कॆ श्री.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, L.B.T English Medium School या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, काळेवाडी रहाटणी, श्रीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ शॆलेंद्र कुलकर्णी यांनी भुषवले.  जेष्ट नागरिक बनकर मामा यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. उपस्थित सर्वानी झेंड्याला मानवंदना देण्यात आली.
   
            याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती व कसरतीचे प्रात्याक्षिक दाखवून उपस्थितांची दाद मिळवली. आलेल्या  संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री मच्छिंद्र तापकीर यांनी पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे आभार मानले.
(कार्यक्रमाची काही क्षणचित्रे)






 

No comments :

Post a Comment