१४ एप्रिल २०१८:- भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती
निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे साई मल्हार सोशल फाऊंनडेशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक श्री बाबा त्रिभुवन यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणागीते सादर करण्यात आली.
यावेळी साई मल्हार सोशल फाऊंनडेशनचे अध्यक्ष श्री मल्हारीशेठ तापकीर, विमलसन्स उद्योग
समूहाचे उमेश शिंदे, ओझोन टेक सोलुशनचे प्रवीण थिटे,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, राजूशेठ पवार, अनील धांडोरे,बाळासाहेब गायकवाड, रविंद्र बामगुडे, संतोष जाधव, अविनाश दाबके, मदन चौधरी, सिजु नायर आदी कार्यकर्ते व साई मल्हार सोशल फाऊंनडेशन चे सदस्य उपस्थित होते.

साई मल्हार सोशल फाऊंनडेशन चे सचिव विवेक तापकीर
यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.
No comments :
Post a Comment