कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे !

   


ज्या पावसाच्या आगमनाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. त्याच पावसाने  सांगली सातारा कोल्हापुरात आहाकार माजविला. निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, निसर्गाने आपले वर्चस्व सिध्द केले. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले जवळची माणसे गमावली. जीवापाड जपलेली जनावरे मृत्युमुखी पडली.

     अश्या बांधवाना आधार देण्यासाठी काळेवाडी रहाटणी असोशिएशन च्या वतीने #एक हात आधाराचा हा उपक्रम राबविला विभागातील सर्व केमिस्ट बांधवाच्या सहकार्याने पूरग्रस्त बांधवासाठी औषधे, ब्लाकेट, पाण्याच्या बाटल्या, अश्या जीवनावश्यक वस्तू सांगली जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशन कडे दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी समक्ष भेट देवून सुपूर्त करण्यात आल्या.

पूरग्रस्त बांधवांचे  लवकरात लवकर जनजीवन सुरळीत होवो. हीच साईचरणी अपेक्षा 



  

No comments :

Post a Comment