कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजातील अनेक घटक झटत आहेत. ऊन,वारा, पाउस यांची तमा न बाळगता अनेकांनी आपले काम सुरु ठेवले. अनेकांनी डॉक्टर, नर्स पोलीस यांचे आभार मानले. पण दुर्लक्षित राहिला तो आपला सफाई कामगार...!
सफाई कामगार यांनी lockdown कालावधीत देखील आपले काम चालू ठेवून संसर्ग रोखण्यासाठी मदत केली रोजच्या रोज साफसफाई झाल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
त्यामुळे काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन व व्यंकटेवरा मित्रमंडळाच्या वतीने साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला.
No comments :
Post a Comment