भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आजय जाधव यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणागीते सादर करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकात तापकीर, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री विवेक तापकीर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या सौ. अश्विनीताई तापकीर, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, ओझर्डे चे प्र.मुख्याध्यापक लक्ष्मण रणवरे, मराठवाडा युवा मंचचे बाळासाहेब गायकवाड, बापू ढावारे, बाबा थोरात, बाळू दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कै श्री भाऊसाहेब तापकीर शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका जयश्री पवार, श्रीम उल्का जगदाळे, रवींद्र बामगुडे, पूनम कांबळे, अदिती दिवे, अर्चना सपकाळ यांनी केले.
No comments :
Post a Comment