कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

       


        साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत साई मल्हार मेडिकल शेजारी तापकीर चौक, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
      
       करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे. 
       
     सदर मोफत आरोग्य शिबिरामध्ये ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्त दाब तपासणी, व बॉडी मास इंडेक्स यांची  मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच  लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर निनाद महाले (M.D, M.B.B.S, D.C.H) यांच्या दवाखान्याचे उदघाटन होणार आहे.
       
     महाराष्ट्रात जाणवत असलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निरोगी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे.
        
    काळेवाडी, तापकीरनगर, श्रीनगर, रहाटणी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
        

No comments :

Post a Comment