कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

हिवाळ्यात बाजरी खाण्यामुळे शरिराला होणारे फायदे

             
            बाजरी : बाजरीस इंग्लिशमध्ये पर्ल मिलेट (pearl millet) असे सुरेख नाव आहे. यास बाजरा असे ही म्हटले जाते. सर्व धान्यांमध्ये सर्वाधिक लोह बाजरीत आहे. परंतु हे लोह फेरीक (ferric) या स्वरूपात असल्याने त्याचे शोषण होणे अवघड असते. तृणधान्यांमधील लोहाचे शोषण होण्यासाठी आपल्या पोटात हायड्रोक्‍लोरीक ऍसिडचा (hcl ) स्त्राव योग्य होणे गरजेचे असते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्यास हा पाचक
स्राव त्या त्या वेळी स्त्रवतो व तृणधान्यांतील लोहास पचनसुलभ बनवतो. अनियमित जेवणाच्या वेळा असणारे, तसेच भूक लागली नसताना जेवणाऱ्यांमध्ये त्यामुळेच बऱ्याचवेळा ऍनिमिया (anaemia) आढळून येतो. भाकरी असलेल्या जेवणात नैसर्गिक "क' जीवनसत्त्व असणारे पदार्थ असल्यास (उदा. लिंबू, टोमॅटो, पपई, शेवगा, आंबट फळे) फेरीक लोहाचे रूपांतर फेरस (ferrous) या प्रकारात होऊन त्या लोहाचे उत्तम शोषण होऊ शकते.


          देशातील ७० टक्के स्त्रियांमध्ये अॅनिमियाची समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शरीरास योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा होणे आवश्यक असते. बाजरीमधून मुबलक लोह मिळते. यात फक्त लोहच नाही तर, प्रोटीन्स, कॅल्शिअम आणि जीवनसत्व 'अ' आणि 'ब' सुद्धा मिळते. तसेच फॉस्फरससारखे न्युट्रीयन्ट्सही मिळतात. यामुळे अॅनिमियापासूनच आपले रक्षण होते.
     कॅल्शियममुळे हाडेसुद्धा मजबूत होतात. हृम्यीटीक पेन्स आणि मेनोपॉजनंतर उद्भवणाऱ्या ऑस्टीओपोरोसिसची शक्यता बाजरी  खाल्ल्याने कमी होते. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी आहारात याचा समावेश केल्यास दुधाचे प्रमाण वाढते.मायग्रेनमधील डोकेदुखी कमी करता येते. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना आणि इतर तक्रारी कमी होतात. याची पावडर करुन दुधातून किंवा पाण्यातून पेजेच्या स्वरुपात घेता येईल किंवा त्याची भाकरी बनवूनही खाता येईल.

         बाजरी ही ज्वारीप्रमाणेच स्थौल्यहारक व मोठ्या विकारांपासून संरक्षण देणारी आहे. सर्व भाकरी वर्गातल्या धान्यांमध्ये ब जीवनसत्त्व, थोड्या प्रमाणात बेटा केरोरीन तसेच कॅलशियम, आयर्न, पोटेशियम, मॅग्नेशिअम, झिंक, मॅगेनिझ व फॉस्फरस हे क्षार आहेत. आयुर्वेदानुसार बाजरी ही रुक्ष व ऋण आहे. त्यामुळेच मूळव्याध (piles) व मलावरोध (constipation) चा त्रास असणाऱ्यांनी बाजरी शक्‍यतो खाऊ नये. बाळंतिणीला दूध चांगले येण्यासाठी बाजरीचा वापर केला जातो. बाजरीची भाकरी, उंडे, चकोल्या, हुरडा हे पदार्थ अत्यंत पोषक व चविष्ट असे आहेत.

No comments :

Post a Comment