कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

मकरसंक्रातीला तीळगुळाचे महत्व


        भारतीय सण उत्सव परंपरा यांना आरोग्याची उत्त्तम जॊड आहे. आपल्या सणातील आहार हा हवामानानुसार आरोग्यास उपयुक्त ठरणारा असतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे मकरसंक्रात.मकरसंक्रातीला तीळ व गुळ वाटुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांशी आपुलकीचे नाते जपले जात. त्यामुळे ऎकमेकांमधील दुरावा गॆरसमज दुर होऊन एकोपा निर्माण होतो.
 सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात
मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. त्यावरुन आपले प्रा़चीन भारतीय विज्ञान किती प्रगत होतो हे दिसून येते. मकरसंक्रात हा सण जानेवारी महिन्यात येतो. या महिन्यात बोचरी थंडी असते. त्यामुळे शरीराला उष्ण व स्निध आहाराची अवश्यकता असते. ती कमतरता भरुन काढण्यासाठी तीळ गुळ वाटले जातात तीळाचे आरोग्याविषयी महत्व जाणून घेवुया.


तीळ
तीळ (Sesamum indicum) हे एक फुले येणारे लागवडयोग्य झाड आहे. आफ्रिकेत याचे पुष्कळ जंगली भाउबंद आहेत व भारतातही हे मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या तेलबियांसाठी त्याची बहुतेक सगळीकडे लागवड केली जाते. याची फुले साधारणतः पिवळी असतात मात्र काहीवेळा निळ्या आणि जांभळ्या रंगांची फुलेही या झाडाला आल्याचे आढळते.

हे एक बहुवार्षिक झाड असून ते सुमारे ०.५ ते १ मीटर उंच वाढते. याची पाने विरुध्द दिशेला असतात व सुमारे ४ ते १४ सेंटीमीटर लांब असतात. मुळाकडे याची पाने रुंद असून पुष्प-शाखेकडे ती छोटी होत जातात. फुले ही पांढरी ते जांभळी, नलीकाकार,३ ते ५ सेंटीमीटर लांब व तोंडाशी चार पाकळ्या असणारी असतात. यात असणाऱ्या बिया याच मुख्यत्वेकरुन वापरल्या जातात. या बियांचा रंग सामान्यतः पांढरा, मात्र काहीवेळा किंचित गुलाबी,लालसर व काळाही असतो.या तेलबिया आहेत. याच्यापासून उच्च दर्जाचे खाद्यतेल निघते. तीळामध्ये काळे पॉलीश न केलेले तीळ आरोग्यदायी मानले जातात.
    तीळ पौष्टिक आहेत, त्यांच्यात स्निग्धपणा आहे म्हणून तिळाचे तेल अंगाला लावतात.भारतात मकर संक्रांतीचे (तिळसंक्रांती) चे दिवशी तिळगुळ वाटण्याचा प्रघात आहे.तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत होते. तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असते.याच्या तेलातिल आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत.यात लोह ,मॅग्नेशियम ,मॅगनिज ,तांबे ,कॅल्शियम भरपुर प्रमाणात असते.जुन्या काळात बॅबिलॉन येथिल स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकावे म्हणुन तीळापासुन केलेला हलवा खात असत. रोमन योद्धे बल व उर्जेसाठी याचे सेवन करीत.तीळाचे तेल हे शरीरच्या मसाजसाठी व आरोग्यासाठी वापरतात.अभ्यंग व शिरोधारा या क्रियेसा ठी याचा वापर आयुर्वेदात होतो.यात या तेलाला फारच महत्त्व आहे.
तीळ तेल हे मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्‌स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे.
तीळ तेल चिंता करणार्‍यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेल तुमचे कर्करोगापासूनही रक्षण करते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.

गुळ  
            आयुर्वेदानुसार, हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो.बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा. गुळ हा प्रकृतीने गरम असा पदार्थ आहे. यामुळे सर्दी आणि खोकल्यासाठी हा उपयुक्त ठरतो. दम्याच्या रुग्णांसाठीही गुळ परिणामकारक ठरतो. रोज गुळासोबत एक छोटा तुकडा अद्रकचा खाल्ल्याने सांध्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
हिवाळ्यात गुळ आणि काळे तीळ खाणे अस्थमा रोगींसाठी उत्तम ठरते. ५ ग्रॅम बडिशोप आणि १० ग्रॅम गुळ सोबत खा, यामुळे कावीळ कमी होण्यास मदत मिळते. गुळ लवकर पचतो यामुळे साखर नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. गुळासोबत भात खाल्ल्याने घसा साफ होतो आणि आवाजही मोकळा होतो.गुळामुळे पचनक्रियाही चांगली राहते. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे त्यांनी रोज दुपारी जेवणानंतर थोडा गुळ खावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि मेटाबॉलिज्मही योग्य राहतो. रोज एक ग्लास पाणी अथवा दूधासोबत गुळ खाल्ल्याने पोटात थंडावा राहतो.
गुळामध्ये लोहाचे जास्त प्रमाण असते. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी तसेच थकवा जाणवत असल्यास थोडा गुळ खाल्ल्याने एनर्जी लेवल वाढण्यास मदत होते. 
संकलन : गुगल शोध

आपणास आरोग्यदायी मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments :

Post a Comment