कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या वतीने “शिवजयंती महोत्सव” साजरा

 


काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दि. १९) साजरी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

शुभम पन्हाळे या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. प्रगती जाधवर, शिवम येलुरे, पल्लवी कुद्रे, चैतन्य पाठक या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची वाहवा मिळविली. पायल कांबळे यांनी गीत सादर केले.

यावेळी एक मराठा लाख मराठा या संस्थेचे प्रमुख युवराज दाखले,  सचिन लिमकर, जेष्ठ नागरिक संघाचे पद्माकर जांभळे  संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, रवींद्र बामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम गायत्री सोनावणे यांनी केले. उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी आभार मानले.





2 comments :

  1. Iron-Iron Glass glasses - Titanium Works
    Iron-Iron-Iron Glass glasses are an alloy 4x8 sheet metal prices near me made from zinc samsung titanium watch that has a strong copper structure and titanium sunglasses is extremely babyliss pro nano titanium curling iron resistant to titanium trim hair cutter corrosion.

    ReplyDelete