कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्री चंद्रकांत तापकीर यांचा वाढदिवस साजरा...

तब्बल २०१ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान.  
अनेक नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ.
         
      सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


      रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच डॉक्टर महाले लहान मुलांचा दवाखाना या क्लिनिक चे उद्घाटन मा विरोधी पक्षनेते विदयमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी डॉ महाले, राजाराम तापकीर, मल्हारीशेठ तापकीर, स्विकृत नगरसेवक   विनोद तापकीर, हरेश तापकीर, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या सौ. अश्विनी चंद्रकांत तापकीर, ग प्रभाग अध्यक्ष श्री बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सौ सविताताई नरेश खुळे, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, विलास  पाडाळे, मा. नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, नरेश खुळे, संभाजी नढे, नवीन तापकीर,  सरपंच गोविंद वलेकर, युवा नेते अनिल नखाते, हरेश नखाते, कैलास सानप, संजय गायके, पद्माकर जांभळे, महेंद्र बामगुडे, राजूशेठ पवार,आकाश पवार, अनिल पानसरे व इतर मान्यवर , नागरिक उपस्थित होते.
    सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ई.सी.जी, रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तदाब तपासणी, व बॉडी मास इंडेक्स यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांनी सदर आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
     चंद्रकांत तापकीर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतुन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी तब्बल २०१ विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन झाले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
      शिबिराचे आयोजक व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, नवनाथ तापकीर, ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर, रुपेश तापकीर, साई मल्हार सोशल फाउंडेशनचे विवेक तापकीर यांनी उपस्थित मान्यवर रक्तदाते व नागरिक यांचे आभार मानले. नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिर भरवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

       


        साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत साई मल्हार मेडिकल शेजारी तापकीर चौक, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
      
       करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे. 
       
     सदर मोफत आरोग्य शिबिरामध्ये ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्त दाब तपासणी, व बॉडी मास इंडेक्स यांची  मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच  लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर निनाद महाले (M.D, M.B.B.S, D.C.H) यांच्या दवाखान्याचे उदघाटन होणार आहे.
       
     महाराष्ट्रात जाणवत असलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निरोगी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे.
        
    काळेवाडी, तापकीरनगर, श्रीनगर, रहाटणी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
        

तापकीर शाळेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

         

 भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आजय जाधव यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या वतीने “शिवजयंती महोत्सव” साजरा

 


काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दि. १९) साजरी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

सफाई कामगारांचा साडी-चोळी देवून सन्मान

 


    कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजातील अनेक घटक झटत आहेत. ऊन,वारा, पाउस यांची तमा न बाळगता अनेकांनी आपले काम सुरु ठेवले. अनेकांनी डॉक्टर, नर्स पोलीस यांचे आभार मानले. पण दुर्लक्षित राहिला तो आपला सफाई कामगार...!

कोरोनात काळजी घ्या. लक्षणे आढल्यास वेळीच उपचार घ्या.


    कोरोना या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. संसर्गजन्य आजार असल्याने खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. "दो गज दूरी, मास्क हे जरुरी ." या नीतीचा अवलंब करावाच लागणार आहे. तरी काही व्यक्तीना लक्षणे

महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांची नियुक्ती


    आमचे प्रेरणास्थान तथा मार्गदर्शक द महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव पदी अनिल भाऊ नावंदर, कोषाध्यक्ष पदी वैजनाथ जी जागुष्टे, उपाध्यक्ष मुकूंदभाऊ दुबे, अरुणदादा बरकसे, सहसचिव प्रसादभाऊ दानवे, संघटन सचिव मदन भाऊ पाटील, पीआरओ अजित भाऊ पारख यांची बिनविरोध निवड झाली. 

आपणास पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा